Ad will apear here
Next
मालगुंड येथे १८, १९ जानेवारीला चौपन्नावे मराठी विज्ञान अधिवेशन
कवी केशवसुत जन्मस्थान, मालगुंड

रत्नागिरी :
मराठी विज्ञान परिषदेचा रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने चौपन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १८ आणि १९ जानेवारी २०२० रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात होणार आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होईल. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

शनिवारी (१८ जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. या वेळी विज्ञानगीत सादर केले जाईल. स्मरणिका आणि ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन, तसेच मनमोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार आणि उत्तम विभाग पुरस्कारांचे वितरण या वेळी होईल. दुपारी दोन वाजता ‘उच्च शिक्षणातील संधी’ या विषयावरचे चर्चासत्र प्रा. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामध्ये डॉ. विवेक पाटकर, प्रा. सुधीर पानसे, प्रा. भालचंद्र भणगे, प्रा. नागेश टेकाळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता ‘आंबा, फणस आणि काजूची उपयुक्तता’ या विषयावर प्रा. रेखा सिंघल यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सन्मानकरी आणि मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी वार्तालाप होईल. 

रात्री आठ वाजता मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवितावाचनाचे संयोजन कवी अरुण म्हात्रे करणार असून, त्यामध्ये अशोक नायगावकर, नमिता कीर आणि कैलास गांधी सहभागी होतील. त्याच वेळी स्थानिक विद्यार्थी आणि सर्वांसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम होईल. त्याचे संयोजन मुंबईच्या खगोल मंडळाचे दिलीप जोशी आणि रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग करणार आहे.

रविवारी (१९ जानेवारी) सकाळी १० वाजता ‘उद्योगधंदे आणि भविष्यातील संधी’ या विषयावर स्थानिक कारखानदारांचा सहभाग असलेले चर्चासत्र होईल. दुपारी १२ वाजता ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान, तर दुपारी दोन वाजता ‘महिलांसाठी घरगुती व्यवसाय’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी चार वाजता विज्ञानप्रसारकांकडून विज्ञानवारीची माहिती दिली जाईल. सायंकाळी साडेपाच वाजता खुले अधिवेशन पार पडेल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता विज्ञान एकांकिका सादर केली जाणार आहे.

अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

(अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXQCI
Similar Posts
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार रत्नागिरी : ‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे रत्नागिरी : ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ
चिपळुणात २८-२९ डिसेंबरला दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन पुणे : दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूणमध्ये २८ आणि २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language